-
बॉलिवूड कलाकार म्हटलं की त्यांच्याविषयी वाचायला सगळ्यांना आवडतंच. करीना कपूर ही आघाडीची अभिनेत्री आहे. कुणाला कुठल्या विचित्र सवयी आहेत आपण जाणून घेऊ.
-
अभिनेत्री करीना कपूरला नखं कापायची सवय आहे. तिची ही सवय अनेक लोकांना माहित नाही.
-
आमिर खानला बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट असं म्हटलं जातं. मात्र त्यालाही एक विचित्र सवय आहे.
-
आमिर खानला अंघोळ करायला आवडत नाही. त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की गुलाम सिनेमाच्या सेटवर त्याने कैक दिवस अंघोळ केलेली नव्हती.
-
अभिनेता शाहिद कपूर हादेखील आघाडीचा अभिनेता आहे. त्याचा ब्लडी डॅडी हा सिनेमाही चर्चेत होता. या शाहीदलाही एक विचित्र सवय आहे.
-
शाहीद कपूरला कॉफी फार आवडते. तो दिवसाला १० कप तरी कॉफी पितो.
-
अभिनेता शाहरुख खान त्याच्या आगामी जवान या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात तो नकारात्मक भूमिकेतही दिसणार आहे. तसंच त्याला किंग खान असंही म्हटलं जातं.
-
शाहरुख खानला बूट वारंवार काढायची सवय आहे. तो अनेकदा बूट काढतो आणि घालतो. त्याला ही विचित्र सवय आहे.
-
अभिनेता सैफ अली खानला अंघोळीला बराच वेळ लागतो. सैफ अली खानच्या बाथरुममध्ये एक लायब्ररी आहे, त्याचा फोनही तिथेच असतो. एनडीटीव्हीने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
-
अभिनेत्री दीपिका पदुकोणला एअरपोर्टवर जो वेळ मिळतो त्या वेळात लोकांचं निरीक्षण करायची सवय आहे. तिनेच एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

७ एप्रिल पंचांग: बुध मार्गी होऊन ‘या’ राशींना देणार प्रचंड धनलाभ आणि सन्मान; तुम्हाला कोणत्या मार्गे मिळेल आनंद; वाचा राशिभविष्य