-
स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास ‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातून मांडण्यात आला होता.
-
या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही तुफान यशस्वी ठरला.
-
‘धर्मवीर’च्या या दिमाखदार यशानंतर जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेऊन ‘धर्मवीर २’ची घोषणा निर्माते मंगेश देसाई यांनी केली.
-
‘धर्मवीर’ चित्रपटाच्या यशानंतर ‘धर्मवीर २’ची चर्चा सुरू झाली होती.
-
अखेर ही चर्चा केवळ चर्चा न राहता आता प्रत्यक्षात उतरण्यास सज्ज झाली आहे.
-
साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेद्वारे मंगेश देसाई या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
-
मंगेश देसाई यांनी ‘धर्मवीर’ चित्रपटीचीही निर्मिती केली होती.
-
‘धर्मवीर’ चित्रपटाच्या यशात उत्तम स्टारकास्टसह लेखन, दिग्दर्शनही महत्त्वाचं ठरलं होतं.
-
अनेक पुरस्कारही या चित्रपटला मिळाले होते.
-
प्रवीण तरडे ‘धर्मवीर २’चे लेखन, दिग्दर्शन करणार असल्यानं हा चित्रपटही दमदार होईल यात शंका नाही.
-
पोस्टरवर भगव्या बॅकग्राऊंडवर ‘धर्मवीर २’ साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट… अशी टॅगलाईन नमूद करण्यात आली आहे.
-
त्यामुळे हा चित्रपट धडाकेबाज पद्धतीने आणि रंजक कथानकाद्वारे हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचा प्राथमिक अंदाज बांधता येत आहे.
-
चित्रपटात कलाकार कोण असणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
-
मात्र ‘धर्मवीर २’च्या घोषणेमुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मंगेश देसाई / इन्स्टाग्राम)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स