-
साऊथचे सुपरस्टार रजनीकांत नेहमीच चर्चेत असतात.
-
नुकताच त्यांचा ‘जेलर’ चित्रपट प्रदर्शित झाला.
-
पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
-
रजनीकांत यांनी आत्तापर्यंत १६८ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
रजनीकांत यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे.
-
मिळालेल्या माहितीनुसार रजनीकांत यांची एकूण संपत्ती ५१ मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे जवळपास ४३० कोटी रुपये आहे.
-
रजनीकांत एका चित्रपटासाठी ५० कोटी रुपये घेतात.
-
त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘जेलर’ चित्रपटासाठी त्यांनी १५० कोटी रुपयांचे मानधन आकारले होते.
-
चेन्नईमध्ये रजनीकांत यांचा आलिशान बंगला आहे.
-
२००२ मध्ये बनवलेल्या या बंगल्याची किंमत ३५ कोटी रुपये आहे.
-
रजनीकांत यांच्याकडे एक शुभमंगल कार्यालयही आहे.
-
या कार्यालयात २७५ लोकांची राहण्याची आणि १ हजार लोकांची बसण्याची व्यवस्था आहे.
-
या हॉलची किंमत जवळपास २० कोटी रुपये आहे.
-
रजनीकांत लक्झरी कारचे शौकीन आहेत. त्यांच्याकडे महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे.
-
त्यांच्याकडे ‘रोल्स रॉयल फॅंटम’ व ‘रोल्स रॉयल घोस्ट’ या कार आहेत.
-
याची किंमत अनुक्रमे १६.५ कोटी व ६ कोटी इतकी आहे.
-
. ‘बीएमडब्ल्यू एक्स ५’ ही महागडी गाडीही रजनीकांत यांच्याकडे आहे.
-
याशिवाय २.५५ कोटींची ‘मर्सिडीज बेन्झ’ आणि ३.१० कोटींची ‘लम्बोर्गिनी’ही त्यांच्याकडे आहे.
![Sun transit in dhanishta nakshtra](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2024-06-08T201503.979.jpg?w=300&h=200&crop=1)
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा