-
अभिनेत्री पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो साभार – पूजा सावंत इन्स्टाग्राम)
-
पूजा अभिनयाबरोबरचं आपल्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत असते. (फोटो साभार – पूजा सावंत इन्स्टाग्राम)
-
पूजाला एक भाऊ आणि एक बहीण आहे. (फोटो साभार – रुचिरा सावंत इन्स्टाग्राम)
-
या दोघांबरोबर पूजा नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करतं असते. (फोटो साभार – रुचिरा सावंत इन्स्टाग्राम)
-
पूजाच्या भावाचं नाव श्रेयस असून बहीणच नाव रुचिरा आहे. (फोटो साभार – रुचिरा सावंत इन्स्टाग्राम)
-
पूजाची बहीण नेमकं काय काम करते? याचा खुलासा नुकत्याच एका पॉडकास्टमधून तिनं केला आहे. (फोटो साभार – रुचिरा सावंत इन्स्टाग्राम)
-
पूजा व रुचिरा अलीकडेच अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी दोघींनी त्यांचा प्राण्यावर किती जीव आहे, याबद्दल सांगितलं. (फोटो साभार – रुचिरा सावंत इन्स्टाग्राम)
-
रुचिरा ही एक सर्टिफाइड प्राणी बचावकर्ती आहे. (फोटो साभार – रुचिरा सावंत इन्स्टाग्राम)
-
रुचिरा या पॉडकास्ट कार्यक्रमात म्हणाली की, “मी १२वी पासून कॉलेज करता करता कुठल्याही एनजीओमध्ये काम करायचे. मी जिथं जायचे, तिथं प्राण्यांना कशाप्रकारे सोडवलं जातं? याच सगळं प्रशिक्षण मिळायचं. शिवाय आम्हाला कोणत्या प्राण्याला कोणतं औषध द्यायचं? याचं मार्गदर्शनही दिलं जायचं.” (फोटो साभार – रुचिरा सावंत इन्स्टाग्राम)
-
पुढे रुचिरा म्हणाली की, “प्राण्यांना सोडवताना खूप भारी वाटतं. हेच आयुष्य आहे, असं वाटतं. हा एक वेगळाच आनंद आहे, जो आपल्याला आतल्या मनाला खूप आनंदी ठेवतो” (फोटो साभार – रुचिरा सावंत इन्स्टाग्राम)
-
अशी ही पूजा सावंतची धाडसी बहीण रुचिरा जरी इतर प्राण्यांना सोडवतं असली तरी ती एका प्राण्याला भयंकर घाबरते. ते म्हणजे झुरळ. (फोटो साभार – रुचिरा सावंत इन्स्टाग्राम)
-
दरम्यान पूजाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी तिच्या ‘मुसाफिरा’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. (फोटो साभार – पूजा सावंत इन्स्टाग्राम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…