-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी रांगोळे-कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
शिवानी लवकरच दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपटात दिसणार आहे.
-
सध्या शिवानी ‘सुभेदार’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
-
इन्स्टाग्रामवर शिवानीने ऑर्गेंझा साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवानीने फिकट हिरव्या रंगाची ऑर्गेंझा साडी नेसली आहे.
-
‘Breezy!’ असं साडीतील फोटोंना कॅप्शन शिवानीने दिले आहे.
-
शिवानीच्या या सुंदर लूकची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
-
येत्या १८ ऑगस्टला शिवानीचा ‘सुभेदार’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
-
या चित्रपटात शिवानी सूर्याजी मालुसरे यांच्या पत्नी यशोदाबाईंची भूमिका साकारत आहे.
-
‘सुभेदार’ चित्रपटात अभिनेते अजय पूरकर सुभेदार तान्हाजी मालुसरेंची व्यक्तिरेखा साकारत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे / इन्स्टाग्राम)

Marathi Language Controversy : “मराठी गया तेल लगाने, तुम…”; मुंबईत एल अँड टीच्या सुरक्षा रक्षकाची मुजोरी, मनसेने ‘असा’ शिकवला धडा