-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही महाराष्ट्रातील आघाडीची अभिनेत्री असून अनेक चित्रपटांतून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
‘अप्सरा’ म्हणून लोकप्रिय असलेली सोनाली सोशल मीडियावर सतत वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते.
-
नुकतंच सोनालीने पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.
-
यामध्ये सोनालीने पिवळ्या रंगाची साडी आणि काळ्या रंगाचं फूल स्लीव क्रॉप टॉप घातला आहे.
-
सोनाली या पिवळ्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. वेगवेगळ्या पोजमध्ये तिने सुंदर फोटोशूट केलंय.
-
सोनालीने फोटोला दिलेल्या कॅप्शननुसार हे फोटो तिचा आगामी चित्रपट ‘डेट भेट’मधील असल्याचं समजतंय.
-
दरम्यान, सोनालीच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी हटके कमेंट्स केल्या आहेत.
-
एका चाहत्याने म्हटलंय, “रूममध्ये लाईट लावायची गरज नाही, कारण तू स्वतः एक सोना लाईट.”
-
तर दुसऱ्याने म्हटलंय, “माझी सकाळ तुला पाहून होते अन् रात्र ही तुला पाहूनच होते.”
-
तिसऱ्या चाहत्याने तर एक हिंदी गाण्याच्या ओळींमधून सोनालीच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. त्याने लिहिलंय, “तारीफ करू क्या उसकी, जिसने तुम्हे बनया!”
-
सोनालीचा नवा चित्रपट ‘डेट भेट’ लवकरच अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटात सोनाली कुलकर्णी अभिनेता संतोष जुवेकरसह दिसणार आहे.
-
(Photos: Instagram)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”