-
Elvish Yadav Real Name: एल्विश यादव याने बिग बॉस ओटीटी 2 चे विजेतेपद पटकावले आहे. बिग बॉसच्या १६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका वाईल्ड कार्ड स्पर्धकाने हा मान कमावला आहे.
-
एल्विश यादव हा एक सुप्रसिद्ध भारतीय युट्युबर आहे. एल्विश हा त्याच्या देशी ढंगातील बोलणं व हरियाणवी भाषेतील कॉमेडी युट्युब व्हिडीओच्या माध्यमातून जगभरात पोहोचला आहे.
-
एल्विश यादव हा फक्त युट्युबवरच नाही तर शैक्षणिक स्तरावर सुद्धा अत्यंत हुशार व तल्लख आहे. तो शाळेत आणि कॉलेजमध्ये नेहमी टॉपर्स गटात असायचा
-
शाळा- कॉलेजच्या मित्रांना जोक सांगून तो खूप हसवायचा तेव्हा सहज एका मित्राने त्याला युट्युब चॅनेल सुरु करण्याची कल्पना सांगितली ज्यानुसार त्याने पहिल्यांदा फेसबुक व्हिडीओ बनवला होता.
-
२०१६ मध्ये एल्विशने आपले युट्युब चॅनेल सुरु केले. त्याचे सध्या दोन युट्युब अकाउंट आहेत एक ज्यावर तो कॉमेडी व्हिडीओ बनवून टाकतो आणि दुसऱ्यावर त्याचे लाइफस्टाइल ब्लॉग सुद्धा लोकांना खूप आवडतात.
-
एल्विशचे युट्युबरवर १३ दशलक्ष तर इंस्टाग्रामवर १४ दशलक्ष (१ कोटी ४० लाख) चाहते आहेत.
-
आज ज्या नावाने ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम गाजवलंय त्या एल्विशचं खरं नाव काय होतं हे तुम्हाला माहित आहे का? एल्विशच्या आई वडिलांनी लहानपणी त्याचे नाव सिद्धार्थ यादव असे ठेवले होते
-
मात्र सिद्धार्थच्या मोठ्या भावाची अशी इच्छा होती की त्याचे नाव एल्विश असे असावे. त्याच्या इच्छेकडे तेव्हा कोणीच लक्ष दिले नव्हते
-
दरम्यान एल्विशच्या भावाचे काही वर्षांपूर्वी आकस्मित निधन झाले आणि तेव्हा आपल्या भावाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सिद्धार्थने आपले नाव बदलून एल्विश असे केले. आणि आता फॅन्स सुद्धा त्याला याच नावाने ओळखतात

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”