-
अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकांरापैकी एक आहे.
-
बॉलीवूडमधील आघाडीचा कलाकार म्हणून त्याला ओळखले जाते.
-
पण, कॅनडाचे नागरिकत्व असल्याने त्याच्यावर अनेकदा टीका झाली आहे.
-
आता अखेर अक्षय कुमारला भारताचे नागरिकत्व प्राप्त झाले आहे.
-
त्याने स्वत: पोस्ट करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे.
-
“मन आणि नागरिकत्व दोन्हीही हिंदुस्तानी. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद”, असे कॅप्शन अक्षयने या फोटोला दिले आहे.
-
मात्र भारतीय नागरिकत्व नसल्यामुळे अक्षयला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
-
अक्षयच्या कॅनेडियन नागरिकत्वावरुन त्याला कॅनडा कुमार असेही बोललं गेलं.
-
‘लल्लन टॉप’ला दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने कॅनडाचे नागरिकत्व का स्वीकारले? याबाबतचा खुलासाही केला होता.
-
या मुलाखतीत अक्षय म्हणाला, “अनेक वर्षांपूर्वी माझे चित्रपट चांगले चालत नव्हते. माझे जवळपास १४-१५ चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले.”
-
“त्यावेळी मला असे वाटलं की मी कुठेतरी दुसरीकडे काम करायला हवे.”
-
“यानंतर मी माझ्या कॅनडामध्ये राहणाऱ्या मित्राला फोन केला.”
-
“त्यावेळी त्याने मला कॅनडामध्ये स्थायिक हो असा सल्ला दिला.”
-
“हल्ली बरेच लोक कामाच्या निमित्ताने कॅनडामध्ये येत आहेत आणि त्यातील बहुतांश भारतीय आहेत.”
-
“त्यानंतर मला असं वाटलं की माझे नशीब मला साथ देत नाही.”
-
“त्यासाठी मला काही तरी करणं गरजेचे आहे.”
-
“मी तिथे कॅनडामध्ये गेलो. नागरिकत्वासाठी अर्ज केला आणि ते मिळाले.”
-
“मात्र काही कालावधीनंतर माझं मत परिवर्तन झाले.”
-
“त्यातच बॉलिवूडमधील माझे चित्रपट यशाच्या एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले होते.”
-
“माझ्याकडे पासपोर्ट आहे. ज्याद्वारे आपण एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करु शकतो.”
-
“मी एक भारतीय आहे. मी सर्व कर भरतो. मला तिथेही कर भरण्याचा पर्याय आहे.”
-
“पण मी ते माझ्या देशासाठी करतो. बरेच लोक विविध गोष्टी बोलत असतात.”
-
“पण मी भारतीय आहे आणि भारतीयचं राहणार.”
-
“मी भारतीय असल्याचा मला पुन्हा पुन्हा दाखला द्यावा लागतो, हे फार वाईट आहे”, असे अक्षय कुमार यावेळी म्हणाला होता.

Highest Total in Champions Trophy: इंग्लंड संघाने घडवला इतिहास, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील उभारली सर्वात मोठी धावसंख्या