-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकरने २०१७ मध्ये एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंशी लग्न केले.
-
क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे दोघेही एकमेकांना १९९७ पासून ओळखत होते.
-
मुंबईतील रुईया कॉलेजमध्ये त्यांनी एकत्र महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. परंतु, तेव्हा दोघेही एकमेकांशी प्रचंड भांडायचे.
-
२००१ ला कॉलेज संपल्यावर दोघेही जवळपास ९ वर्षांनी म्हणजेच २०१० पुन्हा भेटले आणि त्यांच्यात मैत्री झाली.
-
क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे दोघेही नुकतेच ‘कपल ऑफ थिंग्ज’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
-
यावेळी दोघांनी त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले आणि चाहत्यांबरोबर १९९७ पासूनचे जुने फोटो शेअर केले.
-
क्रांती कॉलेजच्या दिवसांमध्ये नाटकाची तालीम करून लेक्चर्सला हजर राहायची.
-
दुसरीकडे समीर वानखेडे कॉलेजमध्ये अत्यंत हुशार आणि वर्गात पहिल्या बाकावर बसायचे.
-
कॉलेजनंतर २०१० मध्ये पुन्हा भेट झाल्यावर दोघांनीही एकमेकांचे फोन नंबर घेतले. पुढे जवळपास ५ वर्षांनी दोघांनीही मनातील भावना व्यक्त करून २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली.
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो