-
OTT प्लॅटफॉर्मवरील ‘स्कॅम १९९२’ या वेब सीरिजमुळे परिचयाचा झालेला चेहेरा म्हणजे श्रेया धन्वंतरी हिचा.
-
नंतर ‘द फॅमिलीमॅन’ या वेब सीरिजमधून आणि ‘चूप’ या चित्रपटामुळे श्रेयाच्या लोकप्रियतेमध्ये आणखी वाढ झाली.
-
आता श्रेया लवकरच ‘गन्स अँड गुलाब्स’ या वेबसीरिजमधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
याच वेबसीरिजसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यानचे काही फोटोज आणि आपल्या हॉट अवतार श्रेयाने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
लाल ग्लॅमरस साडी, मोकळे केस आणि केसात माळलेला गुलाब हा श्रेयाचा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
-
श्रेया तिच्या सोशल मीडियावर असेच बोल्ड आणि हॉट लूकमधील फोटोज शेअर करत असते.
-
या ग्लॅमरस साडीमध्ये श्रेया फारच सुंदर दिसत असल्याचं तिच्या चाहत्यांनी कॉमेंट करत लिहिलं आहे.
-
अभिनयाकडे वळण्याआधी श्रेया धन्वंतरी एक मॉडेल होती. तिने काही तेलगु चित्रपटातही काम केले आहे.
-
‘वाय चिट इंडिया’ चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण,केले. इम्रान हाश्मी या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता.
-
आता ती चित्रपटांबरोबरच ओटीटीवरील सीरिजमध्येही झळकत असते.
-
श्रेयाची ‘गन्स अँड गुलाब्स’ ही वेबसीरिज नुकतीच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे.
-
‘द फॅमिलीमॅन’ आणि ‘फर्जी’सारख्या वेबसीरिजचं दिग्दर्शन करणाऱ्या राज आणि डीके या जोडगोळीचीच ही वेबसीरिज आहे. श्रेयाबरोबर यात राजकुमार राव, दुलकर सलमान आणि गुलशन देवैया हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. (फोटो सौजन्य : श्रेया धन्वंतरी / इंस्टाग्राम)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य