-
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.
-
‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली.
-
प्राजक्ता ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहे.
-
प्राजक्ता माळी ही सध्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्यात उंच भरारी घेताना दिसत आहे.
-
प्राजक्ता माळीने काही दिवसांपूर्वी पुण्यात नवीन घर खरेदी केलं होतं.
-
त्यानतंर तिने फार्म हाऊस खरेदी केले होते.
-
प्राजक्ताचे हे फार्महाऊस कर्जतमध्ये डोंगराच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे.
-
नुकतंच तिने तिच्या फार्महाऊसचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
-
प्राजक्ताचे कर्जतमधील फार्महाऊस फारच अलिशान आणि प्रशस्त आहे.
-
तिच्या फार्महाऊसच्या आजूबाजूला हिरवागार निसर्गही पाहायला मिळत आहे.
-
प्राजक्ताने तिच्या या फार्महाऊसला ‘प्राजक्तकुंज’ असे नाव दिले आहे.
-
तिच्या फार्महाऊसच्या बाहेर खूप मोकळी जागा आहे.
-
तसेच तिच्या फार्महाऊसमध्ये एक मोठा स्विमिंगपूलही पाहायला मिळत आहे.
-
तिच्या फार्महाऊसमध्ये तीन मोठ्या बेडरुम आहेत.
-
त्याबरोबरच एक मोठा लिव्हींग रुमही या फार्म हाऊसमध्ये पाहायला मिळत आहे.
-
या फार्महाऊसचं इंटेरिअर अत्यंत सुंदर पद्धतीने करण्यात आलं आहे.
-
प्राजक्ताच्या फार्महाऊसमध्ये असलेल्या बेडरुममधून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
-
त्याबरोबरच या फार्महाऊसबाहेर बार एरियादेखील आहे.
-
प्राजक्ताच्या फार्महाऊसच्या मागे एक छोटी नदीही आहे.
-
तिने तिच्या कुटुंबाबरोबर मजा-मस्ती करतानाचे फोटो शेअर केले होते.
-
दरम्यान काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने याच फार्महाऊसवर तिचा वाढदिवस साजरा केला होता.
-
यावेळी संपूर्ण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम सहभागी झाली होती.
-
फोटो – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम, http://www.stayleisurely.com

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ