-
शिवाजी महाराजांचा हा इतिहास चित्रपटरूपात प्रेक्षकांना दाखवण्याचा निर्धार केलेल्या दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘श्री शिवराज अष्टक’ ही चित्रपट श्रुंखला प्रदर्शित करण्याचे ठरवले.
-
या ‘श्री शिवराज अष्टका’तील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘शेर शिवराज’ आणि ‘पावनखिंड’ हे चार चित्रपट प्रदर्शित झाले असून आता लवकरच या अष्टकातील पाचवा चित्रपट ‘सुभेदार- गड आला पण…’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर दिसणार आहे.
-
या चित्रपटात अभिनेते अजय पूरकर यांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे.
-
अभिनेता बिपिन सुर्वे ‘बाजी सर्जेराव जेधे’ यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
या चित्रपटात मृणाल कुलकर्णी यांनी ‘राजामाता जिजाऊ’ यांची भूमिका साकारली आहे.
-
अभिनेता विराजस कुलकर्णी ‘जीवा’च्या भूमिकेत दिसणार आहे.
-
‘सावित्रीबाई मालुसरे’ यांच्या भूमिकेत अभिनेत्री स्मिता शेवाळे दिसणार आहे.
-
‘सूर्याजी मालुसरे’ यांची भूमिका अभिनेता अभिजीत श्वेतचंद्रने साकारली आहे.
-
अभिनेत्री शिवानी रांगोळेने ‘सूर्याजी मालुसरे’ यांच्या पत्नीची यशोदाबाई मालुसरे यांची भूमिका साकारली आहे.
-
अभिनेता श्रीकांत प्रभाकर ‘मोरोपंत’ यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
‘शेलार मामां’च्या भूमिकेत अभिनेता समीर धर्माधिकारी दिसणार आहे.
-
अभिनेता भूषण शिवतरे ‘येसाजी कंक’ यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
सुभेदार तानाजी मालुसरे यांची आई म्हणजे पार्वतीबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री उमा सरदेशमुख तर मुलगा रायबाच्या भूमिकेत अर्णव पेंढारकर आहे.
-
अभिनेते सुनील जाधव ‘वीर बाजी पासलकर’ यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
-
‘सुभेदार’ हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुभेदार आणि दिग्पाल लांजेकर / इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : ऑर्गेंझा साडीतील शिवानी रांगोळेचा सुंदर लूक चर्चेत)

Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्यानिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images