-
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहेत.
-
गेली अनेक वर्षं त्या विविध माध्यमांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
-
त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.
-
त्यांच्या कामाबरोबरच त्या त्यांच्या फिटनेसमुळेही नेहमीच चर्चेत असतात.
-
तर आता त्यांनी त्यांचं फिटनेस सिक्रेट सांगितलं आहे.
-
मृणाल कुलकर्णी लवकरच ‘सुभेदार’ या चित्रपटात जिजाबाईंची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
-
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटाची टीम या चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन करत आहे.
-
याच निमित्ताने या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली.
-
यावेळी मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य उघड केलं.
-
“तुमच्या फिटनेसचं रहस्य काय?” असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, “शिवराज अष्टकाचा भाग झालं की फिट रहायलाच लागतं.”
-
“दिग्पाल पहाटे साडेतीन वाजता उठवतो काय, एखादाच सीन का होईना पण तलवारबाजीचा देतो, त्याचा सराव करायला लावतो.”
-
“अजून पुढचे तीन चित्रपट होईपर्यंत तर फिटनेस ठेवायलाच लागणार आहे.”
-
“पण गमतीचा भाग सोडला तर आपल्या सर्वांनाच आपल्या फिटनेसचं रहस्य माहित असतं.”
-
“जे करायला हवं ते करायचं आणि जे करायला नको ते नाही करायचं म्हणजे तुम्ही फिट राहता.”
-
मृणाल कुलकर्णी यांचं हे बोलणं आता खूप चर्चेत आलं आहे.
-
दरम्यान, त्यांचा सुभेदार हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.
-
या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.
-
या चित्रपटात मृणाल कुलकर्णी यांच्याबरोबरच चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, दिग्पाल लांजेकर, विराज कुलकर्णी, शिवानी रांगोळे, स्मिता शेवाळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य