-
‘माझा नवा तुझी बायको’, ‘फुल ३ धमाल’, ‘खबरदार’, ‘वन रुम किचन’ यांसारख्या चित्रपटात झळकलेल्या अभिनेत्री किशोरी गोडबोले सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसतात. पण त्यांची मुलगी सोशल मीडियावरील एक लोकप्रिय चेहरा आहे.
-
किशोरी यांच्या पावलावर पाऊत ठेवत त्यांच्या मुलीनं सुद्धा अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
-
२०२१ साली किशोरी यांची मुलगी ही पहिल्यांदा एका जाहिरातीमध्ये झळकली होती.
-
किशोरी गोडबोले यांची मुलगी उत्तम अभिनयाबरोबर, उत्तम गाते आणि नृत्यही करते.
-
अशी ही सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा असलेली आणि किशोरी गोडबोलेंची मुलगी म्हणजे सई गोडबोले.
-
सई सुंदर दिसतेच, पण तिनं तिच्या आवाजानं अनेकांची मनं जिंकली आहेत.
-
तिच्या प्रत्येक गाण्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.
-
तिनं तिच्या आई म्हणजे किशोरी गोडबोलेबरोबर नाचतानाचे काही व्हिडीओ सुद्धा शेअर आहेत.
-
सई ही रुईया महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.
-
काही दिवसांपूर्वीच सई कॅडबरी सेलिब्रेशनच्या जाहिरातीमध्ये झळकली होती.
-
तसेच सध्या सईचा ‘देह देवाचे मंदिर’ हे गाणं गातानाचा व्हिडीओ चर्चेत आहे.
-
किशोरी गोडबोलेंच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्या अलीकडेच बंद झालेल्या ‘मेरे साई’ या मालिकेत बायजाबाई या भूमिकेत झळकल्या होत्या.
IND vs BAN: “मी उद्या अक्षरला…, स्वत:मुळे अक्षर पटेलची हॅटट्रिक हुकल्यानंतर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, भारताच्या विजयानंतर काय म्हणाला?