-
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. श्री शिवराज अष्टक मालिकेतील या पाचव्या चित्रपटाची कथा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे.
-
‘सुभेदार’ चित्रपट येत्या २५ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने नुकतीच ‘सुभेदार’च्या संपूर्ण टीमने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ला हजेरी लावली होती.
-
श्री शिवराज अष्टक मालिकेतील सगळ्या चित्रपटांमध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्यामुळे या मुलाखतीत अभिनेत्याला खास प्रश्न विचारण्यात आला.
-
“महाराजांचा जिरेटोप, त्यांचा पोशाख आणि एकंदर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना मनात काय भावना असते?” असा प्रश्न अभिनेता चिन्मय मांडलेकरला विचारण्यात आला.
-
या प्रश्नाचे एका शब्दात उत्तर देत अभिनेत्याने सर्वांचे मन जिंकून घेतले.
-
महाराजांची भूमिका साकारताना ‘कृतज्ञता’ ही एकमेव भावना मनात असते असे चिन्मय मांडलेकरने सांगतिले.
-
चिन्मय पुढे म्हणाला, “श्री शिवराज अष्टक मालिकेतील सगळ्या चित्रपटांमध्ये महाराजांच्या वेशभूषेसाठी अधिकाधिक मेहनत घेतली गेली आहे.”
-
“आजही शिवराज अष्टक मालिकेतील प्रत्येक चित्रपटाच्या आधी सगळ्या कलाकारांची लूक टेस्ट होते.” अशी माहिती अभिनेता चिन्मय मांडलेकरने या वेळी दिली.
-
दरम्यान, ‘सुभेदार’ चित्रपटात अजय पूरकर, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, शिवानी रांगोळे, स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, विराजस कुलकर्णी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. (फोटो सौजन्य : चिन्मय मांडलेकर इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”