-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील विनोदवीरांची नेहमी चर्चा होत असते. पण मध्यंतरी या कार्यक्रमातील काही कलाकारांच्या अफेअरच्या चर्चांना जोरदार उधाण आलं होतं.
-
एकबाजूला प्रियदर्शनी इंदलकर व ओंकार राऊत आणि दुसऱ्या बाजूला शिवाली परब व निमिष कुलकर्णी यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती.
-
त्यानंतर कलाकारांनी या नात्यात फक्त चांगली मैत्री असल्याचं सांगून अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
-
पण आज आपण शिवाली व निमिषच्या कोणत्या फोटोमुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं, ते जाणून घेऊया.
-
काही दिवसांपूर्वीच निमिषनं शिवालीबरोबरच्या अफेअरवर मौन सोडलं होतं.
-
‘कलाकृती मीडिया’ या एंटरटेन्मेंट यूट्यूब चॅनेलवर बोलत असताना निमिष म्हणाला होता की, “जेव्हा शिवालीबरोबरच्या अफेअरच्या बातम्या आल्या होत्या, तेव्हा ‘सहकुटुंब सहपरिवार’ या सेटवरच्या १५ जणांनी तरी त्यासंदर्भातल्य बातम्या पाठवल्या होत्या. त्या पण वेगवेगळ्या वृत्तसंस्थेच्या बातम्या पाठवल्या. हे काय आहे? निमिष हे खरं आहे का?, असं प्रत्येकांनी त्या बातम्यांच्या खाली हे एक वाक्य लिहिलं होतं. पण, ही अफवा आहे. अजिबात असं काही नाहीये.”
-
पुढे निमिष म्हणाला की, “आम्ही खूप चांगले मित्र-मैत्रिणी आहोत. उद्या साक्षी गांधीनं जरी माझ्याबरोबर इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकली, तरी तुम्ही असं काही समजू नका. आम्हाला एकत्र खूप चांगलं काम करायचं आहे, पण ती अफवा मी खूप एन्जॉय केली होती.”
-
दरम्यान, शिवालीनं काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. त्यामुळेच शिवाली व निमिषच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं.
-
अफेअरच्या चर्चेचं मूळ कारण होता हा फोटो. ज्यामध्ये शिवालीनं निमिषचा हात हातात पकडला होता आणि निमिष गोड हसताना दिसत होता. हा फोटो शेअर करत तिनं लिहिलं होतं की, “माझ्या निब्बाबरोबर डेट.” अन् पुढे क्युट बेबी असं हॅशटॅग दिलं होतं.

आता दु:खाचे दिवस संपणार! चैत्र पौर्णिमेच्या आधी ‘या’ राशींच्या दारी पैसा येईल चालून? रखडलेली कामे होऊ शकतात पूर्ण