-
अभिनेता संग्राम साळवी आणि अभिनेत्री खुशबू तावडे यांची जोडी ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.
-
२०१८ साली ते दोघे विवाहबद्ध झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करत असतात.
-
तर आता खुशबूने त्यांची लव्हस्टोरी सर्वांना सांगितली आहे.
-
खुशबू सध्या तिच्या ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेमुळे खूप चर्चेत आहेत.
-
नुकतीच या मालिकेतील कलाकारांनी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमामध्ये हजेरी लावली.
-
त्यावेळी खुशबूने तिचे आणि संग्रामचे सूर कसे जुळले हे सांगितलं.
-
ती म्हणाली, “आमचं शूटिंग सेटवरचं जमलं.”
-
“संग्रामची एक मालिका सुरू होती. तिथे आमची भेट झाली.”
-
“पण खरी आमची लव्हस्टोरी सुरू झाली ती मी त्या मालिकेतून एग्झिट घेतल्यानंतर.”
-
“मग तेव्हा आम्ही एकमेकांचे नंबर शोधण्यापासून सगळं केलं.”
-
“यात आम्ही दोघांनीही कष्ट घेतले नाहीत. ते सगळं आपोआप होत गेलं.”
-
“आतापर्यंत आमच्यापैकी कोणीही एकमेकांना प्रपोजही केलेलं नाही. त्या सगळ्या कळण्यासारख्याच गोष्टी होत्या.”
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”