-
अभिनेत्री परिणिती चोप्राने लेडीज वर्सेस रिक्की बहल या सिनेमातून पदार्पण केलं. मात्र तिला अजूनही म्हणावं तसं यश आलेलं नाही. (फोटो-परिणिती चो्रपा)
-
परिणितीने आत्तापर्यंत शुद्ध देसी रोमान्स, हसी तो फसी, किल दिल अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे.
-
परिणिती सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. लवकरच ती राघव चढ्ढासह विवाहबद्ध होणार आहे.
-
या यादीतलं पुढचं नाव आहे सोनाक्षी सिन्हाचं. सोनाक्षी ही शत्रुघ्न सिन्हांची मुलगी आहे. तिने दबंग सिनेमातून करियर सुरु केलं.
-
सोनाक्षी सिन्हाने नुकतीच एक वेब सीरिजही केली. मात्र हिटच्या प्रतीक्षेत ती अजूनही आहे.
-
सोनाक्षी सिन्हा ही शत्रुघ्न सिन्हांची मुलगी आहे. ती देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (फोटो सौजन्य-सोनाक्षी सिन्हा, इंस्टाग्राम)
-
अभिनेत्री शमिता शेट्टीलाही अद्याप हिट सिनेमा मिळालेला नाही. (सर्व फोटो सौजन्य-शमिता शेट्टी, इंस्टाग्राम)
-
शमिता शेट्टी ही अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण आहे. मात्र तिला अद्याप एकही हिट सिनेमा देता आलेला नाही.
-
अभिनेत्री सोनम कपूर ही अनिल कपूरची मुलगी आहे. तिने साँवरीया सिनेमातून पदार्पण केलं. मात्र आत्तापर्यंत तिला एक हिट मिळालेला नाही.
-
सोनम कपूरने आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र तिला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही.

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक