-
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे.
-
सिद्धार्थ अनेकदा बायको मिताली आणि आई सीमा चांदेकर यांच्यासह फोटो शेअर करत असतो.
-
सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर या पुन्हा विवाहबंधनात अडकल्या आहेत. त्याने पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे.
-
अभिनेत्याने पुढाकार घेऊन आईच्या लग्नाला पाठिंबा दिला. त्याच्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे.
-
“माझ्या सासूचं लग्न!”, असं कॅप्शन देत मितालीने लाडक्या सासूबाईंच्या लग्नातील निवडक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
“खरंच मला अभिमान वाटतो, हा एवढा मोठा निर्णय तू अगदी न डगमगता घेतलास.” असं मितालीने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
सिद्धार्थने सुद्धा आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
-
“Happy Second Inning आई! तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत.” असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
-
मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी चांदेकर कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य : मिताली मयेकर इन्स्टाग्राम)

मराठी बोलण्यास नकार दिल्यामुळं बेळगावमध्ये वाहकाला मारहाण; महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद