-
भारतात दुरचित्रवाणी चालू झाली तेव्हा तिच्याकडे फक्त एक मनोरंजनाचे साधन म्हणून बघितले गेले.
-
हळुहळु बातम्या, काही माहितीपट सादर करण्यात येऊ लागले. नंतर लोकांचे मनोरंजन करता करता त्यांना सामाजिक संदेश देणाऱ्या मालिकांचे प्रसारण केले जाऊ लागले.
-
टीव्हीवर अनेक मालिका सुरु होतात बंद होतात.
-
आपण जेव्हा टीव्ही पाहतो तेव्हा कोणत्याही कार्यक्रमाचा भाग काही मिनिटांतच संपतो.
-
त्यानंतर पुढचा भाग दुसऱ्या दिवशी प्रसारित केला जातो. तुम्ही फक्त एका तासात संपूर्ण एपिसोड पाहता.
-
पण हा एक भाग शूट करायला किती वेळ लागतो हे तुम्हाला माहीत आहे का?
-
तुमच्या मनातही जर असा प्रश्न असेल तर, आज आम्ही आज तुम्हाला याचं उत्तर सांगणार आहोत.
-
टीव्हीवर काम करण्याची पद्धत आणि चित्रपटांमध्ये काम करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील शूटिंगचे काम चित्रपटांपेक्षा खूप वेगळे असते.
-
टीव्ही मालिका कलाकार सांगतात की, ज्या मालिका डेली सोप आहेत, त्यांचे शूट बहुतेक इनडोअर असते. त्यामुळे चित्रिकरणाचे लोकेशन एकच तसेच, तिथेच प्रकाश योजना केलेली असते.
-
तीन कॅमेऱ्यांचे शूटिंग सुरू झाले की, एका दिवसात एका भागाचे चित्रीकरण आरामात पार पडते.
-
नागिन किंवा क्राईम शो, सारख्या बहुतांश मालिकांची शूटिंग बाहेरच होते, यासारख्या मालिकांच्या एका भागाच्या चित्रीकरणासाठी ३ ते ४ दिवस लागतात. कारण यात व्हीएफएक्सवरही काम केले जाते.
-
आठवड्यातून ५ ते ६ दिवस टेलीव्हिजनवर प्रसारित होणाऱ्या मालिकांची शूटिंग सतत सुरु असते. यातील २-३ एपिसोड्स बॅकअपमध्ये ठेवलेले असले तरी अनेक पात्रे जागेवरच हजर असल्याने शूटिंगमध्ये कोणतीही अडचण येत नाही त्यामुळे शूटिंग सतत सुरू राहते. (फोटो सौजन्य : The Indian Express )

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख