-
‘ठरलं तर मग’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.
-
मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना सायलीची मंगळागौर पाहायला मिळणार आहे.
-
मंगळागौरीच्या भागात मालिकेत कोणता ट्विस्ट येणार? याबाबत अभिनेत्री जुई गडकरीने मीडियाशी संवाद साधताना खुलासा केला आहे.
-
जुई म्हणाली, “जे प्रेक्षक दररोज मालिका पाहतात त्यांना सायली हीच खरी तन्वी असल्याची कल्पना आहे.”
-
“सायलीच्या पायावर पानाची जन्मखूण आहे आणि मंगळागौरीचे खेळ खेळताना साहजिकच पाय वगैरे वर होतो त्यामुळे ही जन्मखूण कोणाला तरी दिसणार” अशी माहिती जुईने दिली.
-
जुईने ही जन्मखूण कोणाला दिसणार त्या व्यक्तीचं नाव उघड केलेले नाही.
-
मालिकेत सायली नेहमीच गोंधळलेली किंवा धडपडत असते. असे दाखवण्यात आले आहे.
-
“आता सायलीला मंगळागौरीच्या भागात तिला कोण मदत करणार? या सगळ्या गोष्टी तुम्हाला येत्या भागात पाहायला मिळतील.” असे जुईने सांगितले.
-
तसेच सायलीच्या आईची म्हणजेच ‘प्रतिमा’ या पात्राची एन्ट्री मालिकेत पुन्हा एकदा झाल्याने पुढे काय होणार? याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
‘ठरलं तर मग’ मालिकेचे कथानक सध्या रंजक वळणावर पोहोचले आहे.
-
मालिकेचा नवा भाग दररोज रात्री ८.३० वाजता प्रक्षेपित केला जातो.
-
‘ठरलं तर मग’ मालिकेला पहिल्या दिवसांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे.
-
यामध्ये अभिनेत्री जुई गडकरीने ‘सायली’, तर अभिनेता अमित भानुशालीने ‘अर्जुन’ हे पात्र साकारले आहे.
-
जुई आणि अमितशिवाय मालिकेत प्राजक्ता दिघे, प्रियांका तेंडोलकर, मोनिका दाभाडे, सागर तलशीकर, शिल्पा नवलकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.
-
फोटो सौजन्य : जुई गडकरी इन्स्टाग्राम

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख