-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया देवधरची नुकतीच पहिली मंगळागौरी साजरी झाली.
-
या मंगळागौरी कार्यक्रमातील फोटो अक्षयाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
गेल्यावर्षी २ डिसेंबर रोजी अक्षयाने अभिनेता हार्दिक जोशीबरोबर लग्नगाठ बांधली.
-
नवविवाहितेला देवीजवळ अखंड सौभाग्याचे मागणे मागण्यासाठी मंगळागौर पूजली जाते.
-
या मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी अक्षयाने सोनेरी रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
-
सोनेरी साडीवर अक्षयाने भरजरी दागिन्यांचा साज केला आहे.
-
मंगळागौरीसाठी अक्षयाने हार्दिकच्या नावाची खास मेहेंदी काढली आहे.
-
‘मंगळागौर पुजन…’ असं कॅप्शन अक्षयाने या फोटोंना दिले आहे.
-
नवविवाहिता आणि इतरही अनेक महिलांसाठी आजही मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे.
-
श्रावणातील मंगळवारी नवविवाहितांकडून पहिली पाच वर्षे मंगळागौर पुजली जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर / इन्स्टाग्राम)

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल