-
लोकप्रिय मराठी अभिनेता गश्मीर महाजनी सध्या चांगलाच चर्चेत आहे.
-
त्याचं कारण म्हणजे त्याचे वडील व ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन होय.
-
ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं दीड महिन्यापूर्वी निधन झालं. ते त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले होते.
-
ते एकटेच राहत होते, कुटुंबीय सोबत नव्हते, मुलगा गश्मीरही त्यांच्याबरोबर नव्हता, यावरून गश्मीरला प्रचंड ट्रोल केलं गेलं.
-
आता गश्मीरने मुलाखत दिली आणि त्याची बाजू मांडली.
-
‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गश्मीरने त्याच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं.
-
तसेच त्याने वडिलांवर कर्ज असताना ते त्याला व त्याच्या आईला सोडून वेगळे राहायला निघून गेले, याबाबतही खुलासा केला.
-
मी १५ वर्षांचा होतो, माझी दहावी झाली होती आणि त्यावेळी कळलं की त्यांच्यावर (वडिलांवर) कर्ज आहे. त्यांनी निघून जाण्याचा निर्णय घेतला. – गश्मीर महाजनी
-
घर आईच्या नावाने होतं, ते म्हणाले की आता तुम्ही तुमचं बघा. मी १५ वर्षांचा आणि सोबत एकटीच आई. – गश्मीर महाजनी
-
बँकेच्या रिकव्हरी डिपार्टमेंटची लोकं पाहून भीती वाटायची. ते सगळे एकदम घरी आले, घर सील करणार, नोटीस लावणार असं ते म्हणू लागले. – गश्मीर महाजनी
-
आम्ही बँकेत जाऊन त्यांच्या हाता-पाया पडून सांगितलं की बाबा नसले तरी आम्ही कर्ज फेडू. जर तुम्ही घर जप्त केलं तर आम्ही जाणार कुठे, आम्ही कर्ज फेडू शकणार नाही. मग बँकेने आम्हाला हप्ते ठरवून दिले. – गश्मीर महाजनी
-
मी रात्री जाऊन रस्त्यावर पोस्टर लावायचो. १५-१६ वर्षांचा मुलगा रात्री पोस्टर्स लावतोय, हे पाहून पोलिसांनी पडकलं तर, अशी काळजी आईला वाटायची.- गश्मीर महाजनी
-
. मग ती येऊन रस्त्यावर थांबायची. सोबत वयस्कर बाई आहे म्हटल्यावर तुला प्रॉब्लेम येणार नाही, असं ती म्हणायची. – गश्मीर महाजनी
-
इथून मी सुरुवात केली, नंतर इव्हेंट्स मिळवले, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली. डान्सची संस्था सुरू केली. – गश्मीर महाजनी
-
मला कॉर्पोरेट इव्हेंट्समधून पैसा मिळाला. त्याची कर्ज फेडण्यात मदत झाली.- गश्मीर महाजनी
-
आपण तब्बल सहा वर्षे पैसा कमवून वडिलांचं कर्ज फेडल्याचं गश्मीर सांगतो.
-
मी वयाची १५ ते २१ कर्ज फेडत होतो. – गश्मीर महाजनी
-
कर्जाची पूर्ण परतफेड केल्यानंतर मी आईला म्हणालो होतो की आता पुढच्या इव्हेंटची मी वाट पाहतोय कारण सहा वर्षात पहिल्यांदा मी कमावलेला पैसा कुणालाच द्यायचा नाही. – गश्मीर महाजनी
-
सहा वर्षे मी कमावलेले पैसे फक्त बघायचो आणि कर्ज फेडण्यासाठी देऊन द्यायचो. – गश्मीर महाजनी
-
आम्ही मान मोडून काम केलं. – गश्मीर महाजनी
-
आता माझ्याकडे BMW आहे, मोठा फ्लॅट आहे तर बापामुळेच झालं असणार असं लोक बोलतात. – गश्मीर महाजनी
-
पण माझ्याकडे जे आहे ते मी खूप मेहनत करून कमावलं आहे. आजही मी मेहनत करतो. – गश्मीर महाजनी
-
मी माझ्या कुटुंबाची काळजी घेत हे कमावलं आहे. – गश्मीर महाजनी
-
(रवींद्र महाजनींचे फोटो संग्रहित, तर गश्मीर महाजनीचे फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य