-
‘देवयानी’ ही छोट्या पडद्यावरील मालिका आणि ‘बिग बॉस मराठी’मुळे अभिनेत्री शिवानी सुर्वे प्रसिद्धीझोतात आली.
-
शिवानी सुर्वे गेली अनेक वर्षे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेता अजिंक्य ननावरेला डेट करत आहे.
-
अभिनेत्रीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त अजिंक्यने शिवानीला गोड सरप्राईज दिलं.
-
दोघंही मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये डिनर डेटला गेले होते.
-
अभिनेत्रीने या रोमॅंटिक डेटचे आणि तिने रेस्टॉरंटमध्ये आस्वाद घेतलेल्या पदार्थांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
शिवानीने या फोटोंना “डिनर डेटसाठी तू कोणतंही रेस्टॉरंट निवडलंस, तरीही माझी निवड तूच असशील” असं कॅप्शन दिलं आहे.
-
शिवानी आणि अजिंक्य दोघांनी ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं.
-
त्यांच्या लग्नाला घरून संमती मिळाली असली, तरी सध्या दोघंही करिअरवर फोकस करत आहेत.
-
दरम्यान, अजिंक्य-शिवानीच्या डिनर डेटच्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( फोटो सौजन्य : शिवानी सुर्वे इन्स्टाग्राम )

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…