-
रत्ना पाठक व नसीरुद्दीन शाहांच्या लग्नाला ४१ वर्षे झाली आहेत.
-
नुकतंच नसीरुद्दीन शाहांनी ‘नॅशनल हेराल्ड’ला एक खुलं पत्र लिहिलं, त्यात त्यांनी त्यांच्या व रत्नाच्या आंतरधर्मीय लग्नाबाबत सविस्तर लिहिलंय.
-
मला हिंदू रत्नाशी लग्न करण्याबद्दल कोणताही संकोच नव्हता, तर रत्नाला मुस्लिमाशी लग्न करण्याबद्दल नव्हता. – नसीरुद्दीन शाह
-
जेव्हा मी रत्नाशी लग्न करण्याबद्दल माझ्या घरी सांगितलं तेव्हा माझ्या आईने एकदाच विचारलं की रत्ना इस्लाम स्वीकारणार का? – नसीरुद्दीन शाह
-
तिला मी नाही असं उत्तर दिलं. – नसीरुद्दीन शाह
-
आई म्हणाली की बरोबर आहे, तिचा धर्म कसा बदलता येईल.- नसीरुद्दीन शाह
-
अशारितीने माझ्या आणि रत्नाच्या घरच्यांनीही हे नातं स्वीकारलं. – नसीरुद्दीन शाह
-
रत्नासोबतचा माझा संसार म्हणजे हिंदू आणि मुस्लीम एकत्र राहू शकतात याचा पुरावा आहे. – नसीरुद्दीन शाह
-
२०२० मध्ये दिवंगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे पती आणि मिझोरामचे माजी राज्यपाल स्वराज कौशल यांनी नसीरुद्दीन शाहांच्या लग्नावर प्रश्न उपस्थित केला होता.
-
त्यावरही नसीरुद्दीन शाहांनी प्रतिक्रिया दिली.
-
मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्या लग्नाच्या ३८ वर्षांनंतर माजी कॅबिनेट मंत्रीचा पती प्रश्न विचारेल. त्यांनी मला धमकी दिली आणि माझ्यावर लव्ह जिहादचा आरोप केला – नसीरुद्दीन शाह
-
(सर्व फोटो – इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई