-
एमक्युअर फर्मास्युटिकल्सची सीईओ नमिता थापर ही भारतातील आघाडीची महिला उद्योजक आहे.
-
‘शार्क टॅंक इंडिया’ने तिला वेगळी ओळख मिळवून दिली. या कार्यक्रमाची ती परीक्षक आहे.
-
ती गुजराती कुटुंबात जन्माला आली असली तरी तिला मराठी संस्कृतिबद्दल विशेष प्रेम आहे आणि त्याचं कारण म्हणजे ती पुण्यात राहते.
-
आता तिचा मराठमोळा अंदाज पहिल्यांदाच सर्वांसमोर आला आहे.
-
तिने नुकतंच एक नवीन फोटोशूट केलं.
-
या वेळी तिने नऊवारी साड्या नेसल्या होत्या.
-
विशेष म्हणजे तिच्या या नऊवारी साड्या पैठणी होत्या.
-
नऊवारी साडी नेसून नाकात नथ, तर कपाळावर चंद्रकोर, तर केसाचा अंबाडा आणि त्यात फुलं असा तिने लूक केला होता.
-
याबरोबरच तिने पारंपरिक दागिने घातले होते. आता तिचा हा अंदाज सर्वांनाच खूप आवडला असून यातून तिची मराठमोळी बाजू समोर आली आहे.

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही