-
अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. लवकरच दोघेही विवाहबंधनात अडणार आहेत.
-
२२ जुलैला दोघांनीही गुपचूप साखरपुडा उरकत लग्नाच्या तारखेची घोषणा केली होती.
-
प्रसाद-अमृताचं लग्न नोव्हेंबर महिन्यात असल्याने नुकतीच त्यांच्या केळवणाला सुरुवात झाली आहे. अभिनेत्रीचं पहिलं केळवण तिच्या आजोबांनी आजोळी थाटात साजरं केलं.
-
लाडक्या नातीच्या केळवणासाठी अमृताच्या ८७ वर्षांच्या आजोबांनी पुढाकार घेतला होता.
-
प्रसाद-अमृताने एकमेकांसाठी पहिल्यांदाच सुंदर उखाणे घेतले.
-
अमृता उखाणा घेत म्हणाली, “नाटकाच्या प्रयोगांसाठी फिरते मी वणवण, प्रसादचं नाव घेते आजोबांनी केलं पहिलं केळवण”
-
“कितीही वणवण फिरलीस तरी माझं चित्त फक्त तुझ्यापाशी, अमृताचं नाव घेतो आज केळवणाच्या दिवशी.” असा उखाणा प्रसादने घेतला.
-
दरम्यान, दोघेही १८ नोव्हेंबर २०२३ रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत.
-
‘बिग बॉस’च्या जोडीला खऱ्या आयुष्यात एकत्र पाहून दोघांचेही चाहते सध्या आनंद व्यक्त करत आहेत.
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन