-
‘३ इडियट्स’, ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘मुन्ना भाई एमबीबीएस’, ‘मिशन काश्मीर’ यांसारखे अप्रतिम चित्रपट देणारे प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा आज वाढदिवस. आज ते आपला ७० वा वाढदिवस साजरा करत आहेत.
-
आज चित्रपटसृष्टीत त्यांचं नाव अदबीने घेतलं जातं. वेगवेगळ्या चित्रपटांचं दिग्दर्शन आणि निर्मिती त्यांनी केली आहे. आज याच निमित्ताने विधु विनोद चोप्रा यांचा ऑस्करसाठी नॉमिनेट झाल्याचा एक भन्नाट किस्सा जाणून घेणार आहोत.
-
विधू विनोद चोप्रा यांनी १९७६ मध्ये ‘मर्डर अॅट मंकी हिल’ चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले. हा एक डिप्लोमा चित्रपट होता ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट प्रायोगिक चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही देण्यात आला.
-
यानंतर त्यांचा दुसरा चित्रपट १९७८ मध्ये आला, ज्याचे नाव ‘अॅन एन्काउंटर विथ फेसेस’ होते, जी एक डॉक्युमेंटरी फिल्म होती. विधू विनोद चोप्रा यांना त्याच्या दुसऱ्या चित्रपटासाठी शॉर्ट सब्जेक्टमधील सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी त्यावर्षी ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते.
-
या ऑस्कर सोहळ्यासाठी त्यांना नेमकं कसं झगडावं लागलं होतं त्याविषयी त्यांनी ‘द लल्लनटॉप’शी संवाद साधताना सांगितलं आहे.
-
त्यावेळी विधु विनोद चोप्रा यांना नामांकन मिळालं असल्याचं एका पेपरात चौथ्या का पाचव्या पानावर छोट्याशा बातमीत छापून आलं होतं.
-
जेव्हा विधु यांनी फिल्म डिव्हिजनमध्ये जाऊन याबद्दल चौकशी केली तेव्हा ही बातमी खरी निघाली. यासाठी खरंच विधु विनोद चोप्रा यांना आमंत्रण होतं. विधु यांच्याकडे पैसे, वेळ सगळ्याचाच तुटवडा होता.
-
त्यानंतर त्यांनी तडक दिल्ली गाठली. त्यावेळी त्यांच्याकडे पासपोर्ट, विजा किंवा पैसे काहीही नव्हते. सोमवारी ऑस्कर सोहळा होता अन् ही बातमी विधु यांना शनिवारी समजली होती.
-
त्यावेळचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी विधु विनोद यांची मदत केली, अन् कोणत्याही पोलिस व्हेरिफिकेशनशिवाय विधु यांना ६ महिन्यांसाठी पासपोर्ट काढून दिला अन् जायची सोय करून दिली. याबरोबरच एयर इंडियाचं तिकीट आणि २० डॉलर एवढा भत्तादेखील त्यांनी दिला.
-
हे सगळं करून जेव्हा विधु विनोद चोप्रा मुंबईत अमेरिकन ऐंबेसीपाशी आले तेव्हा ती बंद असल्याचं त्यांना समजलं.
-
त्यावेळी अमेरिकन ऐंबेसीबाहेरील सुरक्षा रक्षकाला विधु विनोद यांच्याकडे पाहून या व्यक्तीला ऑस्करसाठी नामांकन मिळालं आहे यावर विश्वासच बसत नव्हता.
-
बराच वेळ त्याच्याशी हुज्जत घातल्यानंतर त्याने विधु विनोद चोप्रा यांचं पत्र पाहिलं तो आत जाऊन त्यांच्यासाठी एका आठवड्याचा सिंगल एंट्री वीजा मला माझ्या पासपोर्टवर आणून दिला. त्यानंतरच त्यावर्षीच्या ऑस्कर सोहळ्यासाठी विधु विनोद यांना जाता आलं (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस व सोशल मीडिया)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती