-
अभिनेता भूषण प्रधान हा मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.
-
तो त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो.
-
त्याचे आई-वडील एकत्र राहत असूनही तो पूर्ण नाव लिहिताना ‘भूषण सीमा प्रधान’ असं लिहितो.
-
त्याच्या आणि आडनावाच्या मध्ये वडिलांच्या नावाऐवजी तो त्याच्या आईचं नाव वापरतो.
-
त्याने हा निर्णय का घेतला याचं कारण त्याने सांगितलं आहे.
-
सुलेखा तळवलकर हिच्या युट्युब चॅनलवरील ‘दिल के करीब’ या कार्यक्रमामध्ये मुलाखत देताना तो म्हणाला, “आई-वडिलांचं पटत नाही किंवा त्यांचा घटस्फोट झाल्यावर आपण आपल्या नावापुढे आईचं नाव लावतो असं अनेकांना वाटतं. पण मी माझ्या वडिलांवरही तितकंच प्रेम करतो.”
-
“मला घडवण्यामध्ये दोघांचाही वेगवेगळ्या वाटा आहे. पण आईचा तो कुठेतरी जास्त आहे.”
-
“तिने माझ्यासाठी कष्ट घेतले आहेत, मी अभिनय क्षेत्रात काम करावं हे स्वप्न माझ्याबरोबर पाहिलं आहे.”
-
“जेव्हा मी बाबांना सांगायचो की मला अभिनेता व्हायचं आहे तेव्हा माझं एमबीए झालं असल्यामुळे बाबा मला म्हणाले होते की तुला जर तुझी ही आवड झोपायची असेल तर तुला त्यासाठी पैसे उभे करावे लागतील मी काहीही देणार नाही. पण आईने तसं केलं नाही.”
-
“तुला काय करायचं आहे? मग आपण ते कसं करू शकतो? त्यासाठी काय काम करावं लागेल? याबाबत ती माझ्याशी चर्चा करायची.”
-
“मला आईने खूप पाठिंबा दिला. हे करू नकोस किंवा हे करायला नको असं तिने मला कधीच सांगितलं नाही. कसं करणार आहेस? हा प्लॅन ती मला विचारायची.”
-
“माझ्यासाठी ज्या आईने कष्ट घेतले आहेत तिचं नाव सगळ्यांना कळावं म्हणून मी ‘भूषण सीमा प्रधान’ असं नाव लावतो.”

Vaibhav Suryavanshi: १४ वर्षीय वैभवने रचला इतिहास! ३५ चेंडूत झळकावलं वादळी शतक