-
‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मीरा जोशी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
-
तब्बल पाच वर्षांनंतर मीराचे पुन्हा एकदा मालिकाविश्वात पुनरागमन होत आहे.
-
मीरा उत्तम अभिनेत्री तर आहेच, पण ती उत्कृष्ट नृत्यांगणा आहे.
-
तिने मालिका, चित्रपटांबरोबर काही रिअॅलिटी शो देखील केले आहेत.
-
तसेच तिची एक माहित नसलेली बाजू म्हणजे तिनं डबिंग क्षेत्रातही काम केलं आहे.
-
बॉलीवूडमधल्या ‘पानिपत’ चित्रपटातील अभिनेत्री क्रिती सेनॉनचा मराठीतला आवाज मीराने दिला आहे.
-
अशी ही सर्वगुण संपन्न अभिनेत्री आता ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
-
‘दार उघड बये’ या मालिकेत मीराला पाहता येणार आहे.
-
‘चंपा’ असं तिच्या नव्या भूमिकेच नाव आहे.
-
नुकतेच तिने या मालिकेतल्या भूमिकेतील काही फोटो शेअर केले आहे.
-
या फोटोंमध्ये मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते शरद पोंक्षेंबरोबर ती काम करताना दिसत आहे.
-
मीरा आणि शरद पोंक्षेंचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख