-
अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकताच तिचा वाढदिवस हास्यजत्रेच्या कलाकारांबरोबर कर्जत येथील फार्महाऊसवर साजरा केला.
-
प्राजक्ताच्या वाढदिवसानिमित्त हास्यजत्रेतील सगळे विनोदवीर तिच्या कर्जत येथील ‘प्राजक्तकुंज’ या फार्महाऊसवर गेले होते.
-
प्राजक्ताच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ अभिनेत्री वनिता खरातने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
तसेच अभिनेत्री प्राजक्ताने माळीने सुद्धा हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.
-
वनिता खरात या व्हिडीओला कॅप्शन देत लिहिते, “प्राजक्ताने फार्महाऊस घेतलं आणि आम्ही तिथे पार्टी करायला गेलो नाही, ऐसा हो नहीं सकता! प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवर आम्ही खूप धमाल मस्ती केली.”
-
निसर्गरम्य वातावरण, प्रशस्त ‘प्राजक्तकुंज’ बंगला आणि स्विमिंग पूलमध्ये कलाकारांनी केलेली मजा याची झलक वनिताच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
-
यावेळी समीर चौघुले यांनी अभिनेत्रीचं औक्षण केलं.
-
अमित फाळके, प्रियदर्शनी इंदलकर, वनिता खरात, सचिन गोस्वामी, समीर चौघुले, रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, शिवाली परब, सचिन मोटे, ओंकार राऊत अशी हास्यजत्रेची संपूर्ण टीम प्राजक्ताच्या फार्महाऊसवर उपस्थित होती.
-
दरम्यान, प्राजक्ताला वाढदिवसाची भेटवस्तू म्हणून या संपूर्ण टीमने फोटोफ्रेम गिफ्ट केली आहे.
Chhaava: “नालायक औरंगजेबाने….”, शरद पोंक्षेंची ‘छावा’ चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रत्येक हिंदूने…”