-
सध्या एका मॉडेलची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. कारण ही मॉडेल ललित मोदींसह हरिश साळवे यांच्या लग्नात दिसली होती (सर्व फोटो सौजन्य-उज्ज्वला राऊत, फेसबुक पेज)
-
ललित मोदींसह तिचा हा फोटो व्हायरल झाला आहे.
-
वकील आणि भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांच्या तिसऱ्या लग्नात ललित मोदीही होते. यावेळी ललित मोदी एका मॉडेलसह आले आणि सुरु झाली त्यांच्या नव्या अफेअरची चर्चा.
-
ललित मोदी हे आता मराठमोळी मॉडेल आणि अभिनेत्री उज्वला राऊतला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कारण हरिश साळवेंच्या लग्नात या दोघांची उपस्थिती होती.
-
उज्वला राऊतचा जन्म १९७८ मध्ये झाला. ९० च्या दशकातली सुपरमॉडेल म्हणून उज्वला राऊत ओळखली जाते. तिचे वडील मुंबईचे माजी पोलीस उपायुक्त होते.
-
उज्वलाने वयाच्या १७ व्या वर्षीच फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी तिने फेमिना लुक ऑफ द इयरचा किताबही जिंकला होता. त्यानंतर १९९६ मध्येच फ्रान्सच्या एलिट मॉडेल लुक स्पर्धेतही ती होती. त्या स्पर्धेत पहिल्या पंधरा मॉडेल्समध्ये तिचा समावेश होता.
-
व्हिक्टोरिया सिक्रेटच्या फॅशन शोमध्ये रँप वॉक करणारी ती पहिली भारतीय ठरली होती. २००२ आणि २००३ या सलग दोन वर्षांमध्ये तिने या शोसाठी रॅम्प वॉक केला होता.
-
उज्जवला राऊतचा हॉट अंदाज, तिने अनेक मोठमोठ्या ब्रांडसह जाहिराती आणि फॅशन शो केले आहेत.
-
एमटीव्ही सुपरमॉडेल ऑफ द इयर या सोमध्ये ती परीक्षक म्हणूनही आली होती. यामध्ये तिच्याबरोबर मिलिंद सोमणही होता. ह्युगो, डॉल्से, गुची, ऑस्कर दे ला रेंटा या मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय ब्रांडसाठी तिने रॅम्प वॉक केलं आहे. उज्वलाने २००४ मध्ये स्कॉटलँडचा फिल्म मेकर मॅक्सवेल स्टेअरीशी लग्न केलं. मात्र २०११ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आता ती ललित मोदींसह दिसल्याने या दोघांच्या अफेरच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
उज्वला राऊतचा आणखी एक मोहक आणि खास अंदाज

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…