-
आपल्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजे मराठमोळे नाना पाटेकर होय.
-
. नाना यांनी अनेक सुपरहिट हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे नाना वैयक्तिक आयुष्यात मात्र फारसे नशीबवान राहिले नाहीत. नाना विवाहित असूनही एकटे राहतात.
-
‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार, नाना पाटेकर थिएटर करत असताना नीलकांती नावाच्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते.
-
नीलकांती बँकेत अधिकाऱ्या होत्या, त्यांचा पगार २५०० रुपये महिना होता. त्याकाळी नाना एका शोमधून ५० रुपये कमावायचे.
-
त्यावेळी दोघांची कमाई आनंदात जगण्यासाठी पुरेशी होती. दोघेही दर महिन्याला बचत करायचे.
-
या दोघांचे लग्न अवघ्या ७५० रुपयांत झाले होते. इतकंच नाही तर ते पुण्याला हनिमूनसाठीही गेले होते.
-
नीलकांती यांनी फक्त एकाच चित्रपटात काम केलं होतं, पण त्यांनी नाना पाटेकरांना नेहमीच पाठिंबा दिला.
-
नानांच्या अफेअरमुळे त्या वेगळ्या राहू लागल्या, असं म्हटलं जातं. नाना पाटेकर व नीलकांती यांना मल्हार हा मुलगा असून मागच्या अनेक वर्षापासून नाना आणि नीलकांती वेगळे राहतात.
-
नाना पाटेकर यांचे दोन बॉलीवूड अभिनेत्रींशी अफेअर होते, असं म्हटलं जातं.
-
त्यांचे अभिनेत्री मनीषा कोईरालाशी अफेअर होते. दोघेही बराच काळ लिव्ह-इनमध्ये राहिल्याचंही म्हटलं जातं.
-
या अफेअरचे रुपांतर नात्यात होण्यापूर्वीच नाना पाटेकर दुसऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडले.
-
ती अभिनेत्री होती आयेशा झुल्काव. आयेशाचंही नानांवर प्रेम होतं, असं म्हटलं जातं. पण मनीषा कोईरालाला ही गोष्ट समजल्यावर तिचं व आयेशाचं भांडण झालं. नंतर दोघीही नानांपासून वेगळ्या झाल्या.
-
नीलकांती या मात्र बऱ्याच काळापासून नानांपासून वेगळ्या राहतात.
-
नीलकांती पाटेकर (सर्व फोटो – सोशल मीडियावरून साभार)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार