-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेनं आपल्या विनोदीशैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
-
‘आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ हा गौरवचा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे.
-
तसेच फिल्टरपाड्याचा बच्चन अशी गौरवची दुसरी ओळख आहे.
-
असा हा लोकप्रिय गौरव लवकरच नवनवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
-
गौरव फक्त मराठी नाही तर हिंदी चित्रपटातही झळकणार आहे.
-
‘सांगी’ असं त्याच्या हिंदी चित्रपटाच नाव असून या चित्रपटात तो बॉलिवूडमधला लोकप्रिय अभिनेता शरिब हाशमीबरोबर काम करताना दिसणार आहे.
-
गौरवची वर्णी प्रसाद ओकच्या आगामी चित्रपटातही लागली आहे.
-
प्रसाद ओकच्या ‘परिनिर्वाण’ चित्रपटात गौरव पाहायला मिळणार आहे.
-
पण गौरवसाठी येणारा ऑक्टोबर महिना खास असणार आहे. कारण या महिन्यात गौरवचे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
-
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच ६ ऑक्टोबरला गौरवचा ‘अंकुश’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात गौरव मंग्या हा भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
-
‘अंकुश’ चित्रपटानंतर गौरवचा ‘बॉईज 4’ चित्रपट २० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली.
-
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरिस गौरवचा ‘लंडन मिसळ’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. २७ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख