-
आपल्या मनावर गेली आठ दशकं ज्यांच्या गाण्याची जादू कायम आहे त्या गायिका म्हणजे आशा भोसले. आज त्यांचा ९० वा वाढदिवस.
-
आशा भोसले यांनी आजवर अनेक गाणी म्हटली आहेत. शास्त्रीय गायन, भावगीत, लावणी, कॅब्रे, पॉप अशा विविध प्रकारांमध्ये गाणं म्हणण्यात त्यांचा हातखंडा आहे.
-
गाणं म्हणत असताना ते विशिष्ट उंचीवर कसं न्यायचं आणि ते वेगळ्या धाटणीचं कसं वाटेल, कुठल्या गाण्याला कसा आवाज चालेल? याची उत्तम जाण आशाताईंना आहे.
-
आशा भोसले यांनी एका मुलाखतीत रेशमाच्या रेघांनी या लावणीचा किस्सा सांगितला होता. लतादीदींनी आपल्याला बोलवलं तेव्हा मी घाबरले होते, आता कशासाठी तरी ओरडा पडणार असं मला वाटलं होतं असंही आशाताई म्हणाल्या आणि त्यांनी हा किस्सा सांगितला.
-
मला दीदीने तिच्या खोलीत बोलवून घेतलं. ती पेटी घेऊन बसली होती. तिच्या मागे बाळ (हृदयनाथ मंगेशकर) बसला होता. दीदीने मला पाहिलं आणि म्हणाली हे बघ हे गाणं आलं आहे तुझ्यासाठी.
-
मी त्यावेळी बाळकडेही पाहिलं आणि खाली बसले. गाणं होतं रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढिला..
-
दीदीने ते गाणं मला तिच्या पद्धतीने म्हणून दाखवलं. तिने अगदीच साधी सरळ चाल लावून रेशमाच्या रेघांनी हे गाणं म्हटलं तेव्हा मी हसू लागले.. तर ती म्हणाली तुला याचसाठी बोलवलं आहे कारण तू वात्रट आहेस आणि तू हे गाणं बरोबर गाशील मला माहित आहे. असं म्हणून दीदी (लता मंगेशकर) हसू लागली.
-
त्यानंतर मी ही लावणी गायले आणि ती आजही लोकांच्या स्मरणात आहे. असं म्हणत २०१८ मध्ये झालेल्या एका मुलाखतीत आशा भोसले यांनी हे गाणं त्याच पद्धतीने म्हणूनही दाखवलं.
-
आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली आहेत.
-
एल्विस प्रेस्ले, कॅरमन मरांडा यांच्या गाण्यांच्या प्रभावातून आशा भोसले यांनी आपली गायन शैली दीदींपेक्षा वेगळी केली आणि ती लोकांना भावली आजही त्या आपल्या मनावर अधिराज्य करत आहेत याचं कारणही तेच आहे. (सर्व फोटो सौजन्य-इंस्टाग्राम पेज, आशा भोसले)
-
आशा ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख