-
‘होणारी सून मी ह्या घरची’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जान्हवी म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान आता ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांची भेटीस आली आहे.
-
तब्बल दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर तेजश्रीने पुन्हा एकदा मालिकाविश्वात दमदार पुनरागमन केलं आहे.
-
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत तेजश्री मुक्ता या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
-
या नव्या मालिकेत तेजश्रीबरोबर राज हंचनाळे, शुभांगी गोखले, अपूर्वा नेमळेकर, संजीवनी जाधव महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.
-
तेजश्रीच्या या नव्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
-
अलीकडेच ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्राम पेजवर एक तेजश्रीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता; जो चांगलाच व्हायरल झाला होता.
-
या व्हिडीओमध्ये तेजश्रीनं यंदाच्या गणपतीत तिचा काय प्लॅन आहे? याबाबत सांगितलं होतं.
-
तेजश्री यंदाच्या गणपतीचा प्लॅन सांगत म्हणाली की, “माझ्या सख्या काकाकडे गोरेगावात गणपती असतो. त्यामुळे आम्ही सगळी भावंडं जमून छान मखर बनवू, डेकोरेशन करू आणि खूपच एन्जॉय करू.”
-
दरम्यान, तेजश्रीचं या नव्या भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहेत.

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य