-
‘रात्रीस खेळ चाले’च्या तिसऱ्या पर्वात ‘शेवंता’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कृतिका तुळसकरने मुंबईत नवीन घर खरेदी करत नुकतंच आपलं स्वप्न पूर्ण केलं.
-
कृतिका तुळसकरने मुंबईतील बोरिवली येथे नवीन घर घेतलं आहे.
-
“मुंबईत आल्यानंतर पेइंग गेस्ट, भाड्याचं घर ते स्वतःचं घर यात खूप मोठा काळ होता. आता नवीन घर नवीन जबाबदारी आणि खूप आनंद.” असं कॅप्शन अभिनेत्रीने या नव्या घराच्या फोटोंना दिलं आहे.
-
अभिनेत्रीने डिसेंबर २०२२ मध्ये दिग्दर्शक विशाल देवरुखकरसह लग्नगाठ बांधली होती.
-
विशाल आणि कृतिकाने मिळून बोरिवली येथे स्वतःचं घर खरेदी केलं आहे.
-
दोघांनी मिळून घेतलेल्या नव्या घराच्या दारावर त्यांच्या लाडक्या मांजरीच्या पावलांचे ठसे आहेत. कृतिकाच्या लाडक्या मांजरीचं नाव चिकू असं आहे.
-
“मांजरीमुळे आम्ही नवीन घर घेऊ शकलो त्यामुळे, आमची चिकू या घराची खरी मालकीण आहे.” असं कृतिकाने एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
नव्या घराचे फोटो शेअर केल्यावर अभिनेत्रीवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.
-
दरम्यान, कृतिकाने छोट्या पडद्यावरील मालिकांसह अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”