-
अभिनेता आदिनाथ कोठारे हा मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.
-
त्याला घरातूनच कला क्षेत्राचा वारसा लाभला आहे.
-
बालकलाकार म्हणून त्याने अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.
-
पण त्याला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं नव्हतं असा खुलासा आता त्याने केला आहे.
-
त्याला डॉक्टर व्हायचं होतं. त्यासाठी त्याने प्रवेश परीक्षाही दिली.
-
त्यातही त्याला चांगले मार्क होते. पण त्याला एमबीबीएससाठी एक पेड सीट मिळत होती. २५ लाख देऊन ती ॲडमिशन घ्यायची होती.
-
तेव्हा त्याला वडिलांनी सांगितलं की, “आपण कर्ज घेणार आणि तिथे ॲडमिशन घेणार. नंतर त्याचे हप्ते भरणार आणि शेवटी ते करून जर तुला कलाक्षेत्रातच काम करायचं असेल तर ती एक सीट वाया घालवू नकोस.” मग त्यानेही ती सीट वाया घालवली नाही.
-
त्याने बायोटेक्नॉलॉजी घेऊन त्यात बीएससी केलं. त्यानंतर पुढे एमबीए केलं आहे.
-
हे सगळं करत असताना तो त्याच्या वडिलांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम करत होता.
-
एमबीए केल्यावर त्याने नोकरी केली. प्रितीश नंदी कम्युनिकेशन्समध्ये त्याने असोसिएट एक्झिक्यूटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम केलं.
-
त्यानंतर तो वॉक वॉटर मीडिया या कंपनीमध्ये बिझनेस ॲनालिस्ट म्हणून काही काळ काम करत होता. तिथून बाहेर पडल्यावर त्याने आणि त्याच्या वडिलांनी ‘कोठारे व्हिजन’ ही त्यांची कंपनी सुरू केली.
-
असा प्रवास करत अखेर आदिनाथने अभिनय क्षेत्रात करिअर करायला सुरुवात केली.

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर