-
स्वत:ला कवी मनाचा नेता असे म्हणणारा अभिजीत बिचुकले हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो.
-
त्याने आतापर्यंत नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंतच्या अनेक निवडणुका लढवल्या आहेत.
-
अभिजीत बिचुकलेला ‘बिग बॉस’ मराठी सिझन २ मधील स्पर्धक म्हणूनही ओळखले जाते.
-
नुकतंच अभिजीत बिचुकलेने ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली.
-
यावेळी त्याला राजकीय, सामाजिक त्यांसह मनोरंजनसृष्टीबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले.
-
त्याची अभिजीत बिचुकलेनेही रोखठोक शब्दात उत्तर दिली.
-
यावेळी अवधूत गुप्तेने ‘खरी शिवसेना कोणाची?’ ‘शिंदेंची की ठाकरेंची?’ असा प्रश्न अभिजीत बिचुकलेला विचारला.
-
त्यावर त्याने फारच स्पष्टपणे उत्तर दिले.
-
“छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जर असेल तर ती शिवसेना कोणाचीच नाही.”
-
“फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची असेल.”
-
“शिवरायांची शिवसेना आणि येणाऱ्या काळात ते आम्ही सिद्ध करु”, असे अभिजीत बिचुकले म्हणाला.
-
दरम्यान, अभिजीत बिचुकलेने यावेळी स्वतःच्या इंग्रजीचं कौतुक केले.
-
‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमामध्ये यापूर्वी जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, सुबोध भावे, श्रेयस तळपदे या कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
शिवाय राज ठाकरे, संजय राऊत, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, अमोल कोल्हे हे देखील सहभागी झाले होते.
-
सर्व फोटो – अभिजीत बिचुकले/ कलर्स मराठी – बिग बॉस
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO