-
मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे तेजश्री प्रधान.
-
तेजश्रीनं आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे.
-
तेजश्रीची कोणतीही मालिका असो प्रेक्षक त्या मालिकेवर भरभरून प्रेम करतात आणि त्यामुळे तिच्या मालिका लोकप्रिय ठरतात.
-
आता बऱ्याच काळाच्या अवधीनंतर तेजश्री ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
-
अशातच अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे.
-
त्यामुळे तेजश्री यंदा गणेशोत्सवासाठी जोरदार तयारीला लागली आहे.
-
तेजश्रीनं काही दिवसांपूर्वी यंदाच्या गणेशोत्सवासाठी काय खास प्लॅन आहे? हे सांगितलं होतं.
-
तेजश्री म्हणाली होती की, “माझ्या सख्या काकाकडे गोरेगावात गणपती असतो. त्यामुळे आम्ही सगळी भावंडं जमून छान मखर बनवू, डेकोरेशन करू आणि खूपच एन्जॉय करू.”
-
त्यानुसार आता तेजश्री आपल्या भावंडांबरोबर बाप्पाच्या स्वागतासाठी तयारीला लागली आहे.
-
तेजश्रीनं तयारी करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये तेजश्रीनं ‘तयारी सुरू’ असं लिहीलं पाहायला मिळत आहेत.
-
तेजश्री वेगवेगळ्या रंगाची फुलं बनवताना दिसत आहे.
-
यात तेजश्री फुलातील कळीला रंग काम करताना दिसत आहे.
-
तसेच यामध्ये तेजश्री वेल बनवताना दिसत आहे.
-
अशाप्रकारे तेजश्रीकडे यंदाच्या गणेशोत्सवासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”