-
गश्मीर महाजनी हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो.
-
गश्मीर हा दिवंगत मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मुलगा आहे.
-
. त्याने ‘देऊळबंद’ सारख्या दमदार मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
मराठीतील हँडसम हंक गश्मीर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
नुकतंच सोशल मीडियावर ‘आस्क गॅश’ हे प्रश्नोत्तरांचं सेशन घेऊन चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
-
सोशल मीडियावर घेतलेल्या प्रश्न उत्तरांच्या सेशनमध्ये चाहत्यांनी गश्मीरला वेगवेगळे प्रश्न विचारले होते.
-
गश्मीरला दुसऱ्या एका युजरने, “गश्मीर हे नाव खूप अनोखं आहे…कोणी ठेवले? आई, बाबा की आजी आजोबा?” असा प्रश्न विचारला होता.
-
यावर माझं नाव “गुरुजींनी ठेवले” असा खुलासा गश्मीर महाजनीने केला होता.
-
गश्मीरचं नाव खूप वेगळं आहे, त्यामुळे त्याच्या नावाचा अर्थ काय असा प्रश्नही चाहत्याने विचारला होता.
-
गश्मीर हे खूप मस्त व वेगळे नाव आहे, याचा अर्थ काय असं एका चाहत्याने विचारलं. त्यावर हे हनुमानाचे नाव आहे, असं गश्मीरने सांगितलं.
-
गश्मीर गेले दोन महिने त्याच्या वडिलांच्या निधनामुळे चर्चेत आहे.
-
ज्येष्ठ मराठी अभिनेते व त्याचे वडील रवींद्र महाजनी हे राहत्या घरात मृतावस्थेत आढळले होते.
-
तेव्हापासून गश्मीर सातत्याने चर्चेत आहे.
-
गश्मीरने सरसेनापती हंबीरराव, देऊळबंद, कॅरी ऑन मराठा अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.
-
लवकरच अभिनेता एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (गश्मीरचे सर्व फोटो गश्मीर महाजनी इन्स्टाग्राम, इतर फोटो सोशल मीडियावरून साभार)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स