-
शिल्पा शेट्टी लवकरच ‘सुखी’ या चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. आपल्या कुटुंबाची प्रत्येक गरज पूर्ण करणाऱ्या गृहिणीची भूमिका शिल्पा शेट्टीने या चित्रपटात बजावली आहे. पण एक दिवस ती या जीवनाला कंटाळते आणि तिचे आयुष्य तिच्या पद्धतीने जगण्याचा विचार करते.
-
सध्या शिल्पा तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच ती चित्रपटाच्या प्रमोशनानिमित्त मुंबईत आली होती. यावेळी अभिनेत्रीने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती.
-
वयाच्या ४८ व्या वर्षीही ती मोहक दिसतेय.
-
शिल्पाने या साडीसोबत डीप नेक डिझायनर ब्लाउज घातला होता, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत होती.
-
प्रमोशनसाठी पोहोचलेल्या शिल्पाने यावेळी फोटोग्राफर्सना अनेक पोज दिल्या.
-
साध्या गुलाबी रंगाच्या साडीतही ती खूप सुंदर दिसत होती आणि रिव्हिलिंग ब्लाउजमुळे तिचा लूक एकदम बोल्ड दिसत होता.
-
साडीसोबतच अभिनेत्रीने गळ्यात गुलाबी आणि सोनेरी रंगाच्या मोत्यांचा डिझायनर हार घातला होता.
-
तसंच, गुलाबी रंगाचे फिंगरलेस आर्म स्लीव्हजही तिने घातले होते.
-
शिल्पाने यावेळी कमीत कमी मेकअप केला होता तर, तिने केसही मोकळे सोडले होते.
-
तिने गुलाबी रंगाचे उंच टाचांचे शूजही घातले होते.
-
सुखी या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट 22 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
(फोटो स्रोत: इंडियन एक्सप्रेस)
Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश