-
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली रुचिरा जाधव सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
-
रुचिरा नेहमी नवनवीन व्हिडीओ आणि फोटो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते.
-
शिवाय रुचिरा आपली परखड मत देखील सोशल मीडियावर मांडत असते.
-
काही महिन्यापूर्वी तिची मणिपूरमधील घटनेसंदर्भातील पोस्ट चांगलीच चर्चेत आली होती.
-
अलीकडेच रुचिरा एका ट्रोल करणाऱ्यावर भडकल्याचे पाहायला मिळाल.
-
रुचिराबरोबर नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
-
काही दिवसांपूर्वी रुचिराला भाजप आमदार राम कदम यांच्या दहीहंडीला आमंत्रित करण्यात आलं होतं.
-
या दहीहंडी उत्सवाला रुचिराने सुंदर साडीत हजेरी लावली होती.
-
याचा व्हिडीओ रुचिराने सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
-
पण तिची साडी नेसण्याची पद्धत एका नेटकरीला खटकली.
-
‘तू खूप चुकीच्या पद्धतीची साडी नेसली आहेस. सणासुदीला अंगप्रदर्शन का केलंय?’ अशी त्या नेटकरीनं रुचिराच्या व्हिडीओवर कमेंट केली होती.
-
ही कमेंट पाहून रुचिरा भडकली आणि त्या नेटकरीला तिनं सडेतोड उत्तर दिलं.
-
रुचिरा त्या कमेंटला उत्तर देत म्हणाली की, “माझी फक्त मान, चेहरा आणि कंबरेचा थोडासा भाग दिसतोय. मला असं वाटतंय, हीच साडी नेसण्याची पद्धत आहे. तुमची अपेक्षा काय आहे की, मी भरपावसात पदर सोडायचा का? की बुरखा घालायला हवा होता? आणि मुळात माझी मर्जी… माझा कन्फर्ट. स्त्री ने काहीही परिधान केलं, तरी त्याला नावं ठेवणारे भेटतील, हे तुम्ही आता सिद्ध केलंय. हा दृष्टीकोनाचा भाग आहे. माझ्या आवडत्या सणाच्या शुभेच्छा. एक सूचवते की, एखाद्या स्त्रीविषयी वैर बाळगू नये हे फार हानीकारक असते. काळजी घ्या.”
-
त्यानंतर रुचिराने इन्स्टाग्रामवर स्टोरी देखील शेअर केली. त्यामध्ये तिनं लिहीलं की, “खरंतर मला फरक नाही पडत मला कोण काय बोलतंय. पण वाईट याचं वाटतं की, आपण चंद्रावर पोहोचलो तरी अजून “स्त्री ने काय घालावं, काय नाही” इथेच अडकून आहोत. मी खरंतर अशा कमेंट ना दुर्लक्ष करते. पण जिथे “स्त्रीद्वेष” असेल आणि “स्त्रीत्वावर” गोष्ट येईल, तिथे मी बोलणार…ही छोटीशी गोष्ट दिसते. पण अशाच छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं स्त्रियांना महागात पडलंय. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा द्वेष करते. सूचित करते की, हे पहिल्यांदा घडतंय असं नाही ही स्त्री उगाच माझ्या पोस्टवर नकारात्मक कमेंट करत असते.”
-
रुचिराने दिलेलं सडेतोड उत्तर पाहून तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुक करून दिला पाठिंबा दर्शवला.
धनंजय मुंडेंचा राजीनामा येताच, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर; भाजपा-राष्ट्रवादीविरोधात ११ नेत्यांची टीम तयार