-
शाहरुख खानने त्याला बॉलिवूडचा बादशाह का म्हटले जाते हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. शाहरुखच्या नुकत्याच आलेल्या जवान या चित्रपटाने जगभरात सुमारे ६०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
-
या वर्षाच्या सुरुवातीला शाहरुखच्या पठाणने १००० कोटींहून अधिक कमाई केली होती.
-
एकाच वर्षात बॉक्स ऑफिसवर एवढी कमाई करणारा शाहरुख खान पहिला अभिनेता ठरला आहे. मात्र, या वर्षी त्याचा आणखी एक चित्रपट येणार आहे. शाहरुखच्या आगामी सहा चित्रपटांवर एक नजर टाकूया:
-
डंकी : या वर्षी डिसेंबर महिन्यात शाहरुख खान राजकुमार हिरानीच्या डंकी या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले आहे.
-
टायगर 3: डंकीनंतर शाहरुख २०२४ मध्ये ईदच्या मुहूर्तावर सलमान खानसोबत टायगर ३ मध्ये दिसणार आहे. मात्र, शाहरुख या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहे.
-
हे राम: शाहरुख खानबद्दल काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे की तो त्याच्याच चित्रपट हे रामच्या रिमेकमध्ये दिसणार आहे.
-
टायगर Vs पठाण: टायगर विरुद्ध पठाणवरही काम सुरू आहे. या चित्रपटात शाहरुख आणि सलमान एकत्र दिसणार असल्याचे बोलले जात आहे.
-
सॅल्यूट: भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिक सॅल्यूटमध्ये शाहरुख खान देखील असल्याचे म्हटले जाते. तो राकेश शर्माची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
Izhaar: संजय लीला भन्साळी Izhaar नावाचा चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटात शाहरुख खान दिसणार असल्याचे बोलले जात आहे. (फोटो: सोशल मीडिया)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”