-
गश्मीर महाजनी हा लोकप्रिय मराठी अभिनेता आहे. त्याने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलंय.
-
मराठी अभिनेता गश्मीर महाजनी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
तो सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधतो, चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देत असतो.
-
तो आईला कोणत्या नावाने हाक मारतो, याचा खुलासा त्याने केला आहे.
-
तसेच त्यामागचं कारणही त्याने सांगितलं आहे.
-
गश्मीर आईला आई म्हणत नाही तर अम्मी म्हणतो.
-
त्याच्या आईचं नाव माधवी महाजनी आहे.
-
रविवारी गश्मीरने इन्स्टाग्रामवर ‘Ask Gash’ हे सेशन ठेवलं होतं.
-
यावेळी बहिणीबद्दल बोलताना त्याने आईचा उल्लेख अम्मी असा केला होता.
-
त्यानंतर त्याला आईला अम्मी म्हणण्यामागचं कारण विचारण्यात आलं, त्याचं उत्तर गश्मीरने दिलं.
-
तुम्ही तुमच्या आईला अम्मी का म्हणता, असा प्रश्न त्याला एका चाहत्याने विचारला. त्याचं उत्तर देताना गश्मीरने कारण सांगितलं.
-
“माझे वडील त्यांच्या आईला याच नावाने हाक मारायचे, खूप लहान असताना ऐकले होते, तेव्हापासून हे नाव तोंडात बसले,” असं गश्मीर म्हणाला.
-
गश्मीर महाजनी हा दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी व माधवी महाजनींचा मुलगा आहे.
-
गश्मीरला रश्मी नावाची मोठी बहीण आहे, ती त्याच्यापेक्षा १३ वर्षांनी मोठी आहे.
-
(गश्मीरचे फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवरून साभार, इतर फोटो सोशल मीडियावरून साभार)

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल