-
आयुष्मान खुरानाचा आज ३९ वा वाढदिवस आहे. या ड्रीम गर्ल स्टारला कोणत्याही विशेष परिचयाची गरज नाही. त्याच्या खास दिवशी त्याचे काही जुने फोटो आज पाहू या (फोटो: आयुष्मान खुराना/इन्स्टाग्राम)
-
आयुष्मान अनेकदा त्याचे लहानपणीचे आणि शालेय दिवसातील फोटो शेअर करत असतो. (फोटो: आयुष्मान खुराना/इन्स्टाग्राम)
-
त्याच्या वाढदिवशी, त्याने चाहत्यांनी बनवलेली रील शेअर केली आणि लिहिले, “हे आयुष्य विविध रंगानी भरलेले आहे, अनेक चढ-उतार, आत्म-शंकेचे दिवस आणि रात्र त्याने पाहिले. पण आज मी इथे आहे. अजूनही उभा आहे. अजूनही विश्वास आहे. धन्यवाद माझ्यावर कोणत्याही अटीशिवाय प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला. माझा वाढदिवस खास बनवल्याबद्दल धन्यवाद.” (फोटो: आयुष्मान खुराना/इन्स्टाग्राम)
-
आयुष्मानचा सर्वात पहिली नोकरी ही एका रेडिओ जॉकीची होती. (फोटो: आयुष्मान खुराना/इन्स्टाग्राम)
-
२००४ मध्ये एमटीव्ही रोडीज या रिअॅलिटी टेलिव्हिजन शोचा दुसरा सीझन जिंकल्यानंतर आणि जेव्हा अँकरिंगमध्ये करिअर सुरु केले तेव्हा आयुष्मानने स्वत:ची छाप पाडली. (फोटो: आयुष्मान खुाराना/इन्स्टाग्राम)
-
बॉलीवूडमध्ये त्याने २०१२ मध्ये रोमँटिक कॉमेडी चित्रपट विक्की डोनरमधून पदार्पण केले. (फोटो: आयुष्मान खुराना/इन्स्टाग्राम)
-
त्याच्या अभिनय भूमिकांसोबतच, आयुष्मान त्याच्या गायन कौशल्यासाठी देखील ओळखला जातो. (फोटो: आयुष्मान खुराना/इन्स्टाग्राम)
-
त्याने त्याच्या अनेक चित्रपटांसाठी गाणे गायले आहे आणि त्याच्या नावावर त्याचे काही संगीत अल्बम देखील आहेत. (फोटो: आयुष्मान खुराना/इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”