-
नाना पाटेकर लवकरच द व्हॅक्सिन वार चित्रपटात झळकणार आहेत. यात ते मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (फोटो – नाना पाटेकर फेसबुक)
-
नाना पाटेकर यांनी चित्रपटात कोवॅक्सिनचा शोध लावणाऱ्या टीमचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. (फोटो – नाना पाटेकर फेसबुक)
-
सध्या ते या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी त्यांनी वेलकम ३ मध्ये त्यांना न घेतल्याबद्दल वक्तव्य केलं. (फोटो – नाना पाटेकर फेसबुक)
-
आज आपण नाना पाटेकर यांचं खरं नाव, शिक्षण व ते मुळचे कुठले आहेत, याबाबत जाणून घेणार आहोत. (फोटो – नाना पाटेकर फेसबुक)
-
मराठी कुटुंबात जन्मलेल्या नाना पाटेकर यांचे नाव विश्वनाथ पाटेकर होते. (फोटो – नाना पाटेकर फेसबुक)
-
त्यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात झाला. (फोटो – चित्रपटातील स्क्रीनशॉट)
-
त्यांच्या वडिलांचे नाव दिनकर पाटेकर होते. त्यांची आई संजनाबाई पाटेकर गृहिणी होत्या. (फोटो – नाना पाटेकर फेसबुक)
-
नाना पाटेकर यांना अशोक आणि दिलीप पाटेकर असे दोन भाऊ आहेत.
-
नाना पाटेकर यांच्या पत्नीचे नाव नीलकांती पाटेकर आहे. (फोटो – सोशल मीडियावरून साभार)
-
त्या बँकेत अधिकारी होत्या. नाना व नीलकांती एकत्र राहत नाहीत. (फोटो – सोशल मीडिया फॅनपेजवरून साभार)
-
नाना पाटेकर यांना दोन मुलं होती. (फोटो – सोशल मीडिया फॅनपेजवरून साभार)
-
त्यापैकी एकाचे निधन झाले असून एकाचे नाव मल्हार पाटेकर आहे. (फोटो – सोशल मीडिया फॅनपेजवरून साभार)
-
त्यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. त्यांच्या शाळेचे नाव समर्थ विद्यालय होते. (फोटो – फेसबुक)
-
यानंतर त्यांनी वांद्रे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतले, ज्याचे नाव आता एल.एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट आहे. (फोटो – चित्रपटातून स्क्रीनशॉट)
-
तसेत ते सर जेजे स्कूल ऑफ आर्टमधून पदवीधर आहेत. (फोटो – फेसबुक)
-
नाना यांनी १९७८ मध्ये आपल्या फिल्मी करिअरची सुरवात केली होती. (फोटो – नाना पाटेकर फेसबुक)
-
त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांना आतापर्यंत ३ राष्ट्रीय पुरस्कार, २ फिल्मफेअर पुरस्कार आणि
२०१३ मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे.(फोटो – फेसबुक)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख