-
मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान.
-
तिला भेटण्यासाठी तिचे चाहते नेहमीच खूप उत्सुक असतात. तिचा स्वभाव कसा आहे हे देखील चाहत्यांना जाणून घ्यायचं असतं.
-
तर आता एका लोकप्रिय गायिकेने याचा खुलासा केला आहे.
-
तेजश्रीने आतापर्यंत ज्या भूमिका केल्या त्या सगळ्या भूमिका खूप सोज्वळ पण खंबीर अशा होत्या.
-
खऱ्या आयुष्यातही तेजश्री तशीच आहे का, असा प्रश्न अनेकदा तिच्या चाहत्यांना पडतो. तर खऱ्या आयुष्यात तेजश्रीचा स्वभाव कसा आहे हे एका लोकप्रिय गायिकेने आता सांगितले आहे.
-
गायिका कीर्ती किल्लेदार हिने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘आस्क मी एनीथिंग’ हे सेशन घेतलं.
-
तर यामध्ये एका चाहत्याने “तुझ्यात आणि तेजश्री प्रधानमध्ये कसं बॉण्डिंग आहे?” असा प्रश्न तिला विचारला.
-
त्यावर कीर्तीने तेजश्रीबरोबरचा एक फोटो शेअर करत लिहिलं, “तेजश्री ही मला भेटलेली आत्तापर्यंत खूप गोड आणि टॅलेंटेड मुलगी आहे.”
-
“आमच्यात खूप चांगली मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी मला एका गाण्यासाठी तिला आवाज देण्याची संधी मिळाली होती आणि तेव्हापासून आमची मैत्री घट्ट झाली.”
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख