-
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. अॅटली कुमार दिग्दर्शित या चित्रपटाने एका आठवड्यात जगभरात ६०० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दीपिका पदुकोणही छोट्या पण महत्त्वाच्या भूमिकेत आहे. (PC : Still From Film/Jansatta)
-
शाहरुख आणि दीपिका ही जोडी गेल्या अनेक वर्षांपासून पडद्यावर धुमाकूळ घालत आहे. ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या जोडीने आतापर्यंत पाच सुपरहिच चित्रपट दिले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या हिट जोडीचे चित्रपट आणि त्यांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन. (PC : Still From Film/Jansatta)
-
ओम शांती ओम : २००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटाने जगभरात १४८.१६ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. (PC : Still From Film/Jansatta)
-
चेन्नई एक्सप्रेस : २०१३ मध्ये रिलीज झालेल्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटाने जगभरात ४२४.५४ कोटी रुपयांची कमाई केली होती. (PC : Still From Film/Jansatta)
-
हॅप्पी न्यू ईयर : २०१४ मध्ये रिलीज झालेल्या ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटाने जगभरात ३८३.१० कोटी रुपयांची कमाई केली होती. (PC : Still From Film/Jansatta)
-
पठाण : या वर्षी जानेवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाने जगभरात १०५०.३० कोटी रुपयांची कमाई केली होती. (PC : Still From Film/Jansatta)
-
जवान : सप्टेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ६०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट ‘पठाण’ला मागे टाकू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. (PC : Still From Film/Jansatta)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”