-
अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
ती सोशल मीडियावर वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करत असते. तिने नुकतीच तिच्या नातवासाठी एक पोस्ट शेअर केली.
-
होय. रवीना टंडन आजी आहे. १९९५ मध्ये रवीना अवघी २१ वर्षांची असताना तिने दोन मुलींना दत्तक घेतलं होतं.
-
रवीनाने तेव्हा ११ वर्षांची छाया आणि ८ वर्षांच्या पूजाला दत्तक घेतलं होतं.
-
तिच्या या मुलींची लग्नं झाली असून छायाला रुद्र नावाचा मुलगा आहे.
-
रुद्रचे फोटो रवीनाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तो खूपच क्युट दिसत आहे.
-
घरातील सर्व सदस्यांबरोबरचे तिचे फोटो रवीनाने पोस्ट केेले आहेत.
-
२०१९ मध्ये जन्मलेला रुद्र आता ४ वर्षांचा झाला आहे.
-
काही दिवसांपूर्वीच त्याचा वाढदिवस झाला.
-
रवीना, तिची मुलगी छाया आणि तिचा नातू रुद्र तिघेही या फोटोत खूपच सुंदर दिसत आहेत.
-
(सर्व फोटो रवीना टंडनच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”